हेच प्रश्न रोजरोज
पुनः पुन्हा मलाच छळतात
एकदा दोनदा ,हजारदा, लाखदा,
कितीदा कुणास ठाऊक
उठता बसता ,झोपता ,जागता,
घरीदारी,रस्त्यात,नदी काठी,
सावलीत, उन्हात,मातीत,रेतीत
कुठेही,केव्हाही.,अचानक,
बेधडक,बेसावध,बिनदिक्कत,
'.
येतात पुढे हेच प्रश्न--
कोण मी ?
मी कोण ?
आलो कुठून ?
जायचे कुठे ?
सगळंच अनुत्तरित
उत्तराच्या प्रतिक्षेत
किती काळ असंच
फिरफिर फिरावं लागेल ?
कुणीतरी सांगेल का ?
खदबद संपेल का ?
की तुम्हीही याच
चक्रात वा चक्रव्युहात
अडकलात की काय ?
पुनः पुन्हा मलाच छळतात
एकदा दोनदा ,हजारदा, लाखदा,
कितीदा कुणास ठाऊक
उठता बसता ,झोपता ,जागता,
घरीदारी,रस्त्यात,नदी काठी,
सावलीत, उन्हात,मातीत,रेतीत
कुठेही,केव्हाही.,अचानक,
बेधडक,बेसावध,बिनदिक्कत,
'.
येतात पुढे हेच प्रश्न--
कोण मी ?
मी कोण ?
आलो कुठून ?
जायचे कुठे ?
सगळंच अनुत्तरित
उत्तराच्या प्रतिक्षेत
किती काळ असंच
फिरफिर फिरावं लागेल ?
कुणीतरी सांगेल का ?
खदबद संपेल का ?
की तुम्हीही याच
चक्रात वा चक्रव्युहात
अडकलात की काय ?
No comments:
Post a Comment