तू नाही कुठे ?
तू इथे तिथे सर्वत्र
आतही तू अन् बाहेरी तू
तूच परम पवित्र
ही सृष्टी तुझीच लीला
चंद्र, सूर्य अन् नक्षत्रे ही
दिलीत तूच जगाला,
मालक तू,पालक तू
तूच असे संहारक
पर्वतराजी सुदूर दिसते
दाखविते ती तुझी भव्यता
चराचरातुन स्नेह पाझरे
हीच तुझी दिव्यता
अधांतरी नभ
निळा चांदवा
निळ्या नभातिल सौंदर्याचा
तूच नसे का निर्माता?
हे वारे वाहती मंदगती,
या सरिता धावती कुणाप्रती?
रत्नेशाचा ईश तूच रे
तरीही असे तू सू क्ष्मगती
फुले ही फुलती
जगा खुलविती
सुगंध देती
दिशादिशा प्रती
कणा कणातुन
क्षणा क्षणाला
तव सत्तेची,तव स्नेहाची
ये प्रचिती.
तू इथे तिथे सर्वत्र
आतही तू अन् बाहेरी तू
तूच परम पवित्र
ही सृष्टी तुझीच लीला
चंद्र, सूर्य अन् नक्षत्रे ही
दिलीत तूच जगाला,
मालक तू,पालक तू
तूच असे संहारक
पर्वतराजी सुदूर दिसते
दाखविते ती तुझी भव्यता
चराचरातुन स्नेह पाझरे
हीच तुझी दिव्यता
अधांतरी नभ
निळा चांदवा
निळ्या नभातिल सौंदर्याचा
तूच नसे का निर्माता?
हे वारे वाहती मंदगती,
या सरिता धावती कुणाप्रती?
रत्नेशाचा ईश तूच रे
तरीही असे तू सू क्ष्मगती
फुले ही फुलती
जगा खुलविती
सुगंध देती
दिशादिशा प्रती
कणा कणातुन
क्षणा क्षणाला
तव सत्तेची,तव स्नेहाची
ये प्रचिती.
No comments:
Post a Comment