Wednesday, 1 June 2016

का असं?

इथं तिथं सर्वत्र
तूच तू
तुझाच प्रकाश
सुगंध दिशा दिशात

मी मात्र अजूनही
चाचपडतोय अंधारात
प्रकाशाच्या शोधात
शोध काही लागत नाही
प्रकाश काही दिसत नाही
चाचपडणं संपत नाही

 वाटतो तू हवाहवासा
मी मात्र नकोसा
असं का?

तुझाच अंश
रूप तुझंच

तू मात्र
स्वयं प्रकाशी,तेजस्वी,
स्वतंत्र.स्रष्टा

मी मात्र
परावलंबी,परतंत्र
तुझा असून तुझ्यापासून दूरदूर
का असं ?

No comments:

Post a Comment