Thursday, 15 September 2016

तरीही जगण्याची हौस असते----

तेच ते बेचव पाणी
रोज रोज प्यायचं.
तेच तेच अळणी जेवण
रोज रोज करायचं.
तेच तेच काम
रोज रोज पुनरावृती यंत्रवत्
कंटाळवाणं जीवन .

दिवस रात्री त्याच त्याच
उन्हाळे पावसाळे
कशातच बदल नसतो
रुटिन सारं
नवी नवलाई नसते
तरीही
जगण्याची हौस असते

मरणप्राय जगणं जगता जगता
एक दिवस मरायचं असतं.
येतात लोक ढाळतात नक्राश्रू
हसण्याचं स्वप्न पाहता पाहता
डोळ्यात येतात अश्रूच अश्रू.

1 comment:

  1. चाकोरीबद्ध रुटिन कंटाळवाणं जीवन
    हा या कवितेचा विषय होय

    ReplyDelete