Monday, 10 April 2017
भावतरंग--जेव्हां आपण एकटे असतो
... भावतरंग---जेव्हां आपण एकटे असतो.
मनाचा शोध घेता घेता जाणवते की बहुदा आपणच दोषी असतो पण
मुखवटा धारण करून आपण तो दोष झाकून ठेवतो.त्यामुळे जीवनातील ती
काळी बाजू समोर येत नाही.
जेव्हां आपण एकटे असतो तेव्हां मात्र आपल्याकडून घडलेल्या चुका
आपल्या समोर येतात व माणूस स्वतःलाच कोसू लागतो.सारखं असं पुन्हा
पुन्हा घडू लागल्यास माणसाचं व्यक्तिमत्व दुभंगतं.आपले दोष लपवण्यासाठी
करावी लागणारी कसरत त्याला मनः शांती लाभू देत नाही.उद्विग्नता वाढत
जाते.व त्याच्यात भयगंड व हीनगंड निर्माण होतात.
जो उजळ माथ्याने मोठ्या तोऱ्यात वावरायचा तो एकाकी राहू लागतो
या एकलकोंडेपणातून कधी कधी वेड लागण्याची शक्यता असते.
माणूस भलेही हजारदा इतरांच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी होवो
परंतु जेव्हां वय होतं,परिपक्वता वाढते,शेवटचा दिवस डोळ्यासमोर येतो इंद्रि-यांची शक्ती कमी झालेली असते,तेव्हां भूूतकाळातील चुकीचं वर्तन त्याला छळू
लागतं.मोठी विचित्र अवस्था असते.
शरीरात तसा कोणताच दोष आढळून येत नाही पण मन मात्र बेचैन असतं
ते स्वतःलाच कोसू लागतं.त्यावरचं नियंत्रण आपसुक सुटतं व माणूस बेभान
होतो.
इतरांना कळत नाही की याला काय होतंय.वेगवेगळे तर्क वेगवेगळे निष्कर्ष
काढले जातात.तऱ्हे तऱ्हेचे उपाय सुचवले जातात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment