Wednesday, 12 April 2017
भावतरंग-यशापयशाला आपणच जबाबदार असतो
... भावतरंग-यशापयशाला आपणच जबाबदार असतो
" स्व "चा शोध. स्वतःच्या स्वप्नांचा शोध.इच्छा,अपेक्षा,आकांक्षा
माणसाला कार्य प्रवृत्त करतात.त्यांच्या पूर्तीसाठी त्याची अखंड धडपड असते.
त्याला नेमकं काय हवं आहे हे त्याचं त्यालाच माहीत असतं. त्याच्या प्राप्ती-
साठी चोखाळायचे मार्गही त्यानेच निश्चित केलेले असतात.
त्याच्या सारख्या इच्छा,अपेक्षा, आकांक्षा बाळगणाऱ्या व त्यांच्या पूर्ती साठी
धडपडणाऱ्या ,समानशील असलेल्या व त्यात यशस्वी झालेल्या लोकांनी अनुसरलेल्या मार्गावरून त्याला जायचं असतं.त्यांच्या जीवनप्रणालीचं,धेय्यपूर्ती -साठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं तो अनुकरण करतो.
एकदम नवीन वाट तो आक्रमित नाही.या प्रयत्नात त्याला यश मिळतंच असं
नाही.यश मिळालं तर माझ्या परिश्रमामुळे असा त्याचा ग्रह असतो.अपयश अालं तर कुणाच्या तरी अडथळ्यामुळे असं त्याचं म्हणणं असतं
यशाचं श्रेय स्वतः घ्यायचं,अपयशाचं खापर मात्र दुसऱ्याच्या वा दैवाच्या
डोक्यावर फोडायचं अशीच सर्वांची तऱ्हा असते.यशापयशाला आपणंच ज-
बाबदार असतो याची जाणीव नसतेच त्याला.
हेच त्याचं अद्न्यान.अद्न्यानामुळे नुकसानच होतं.-/
Subscribe to:
Post Comments (Atom)
YouTube - Videoodl.cc - 3D Link, Link, YouTube Video, Videoslots
ReplyDeleteYouTube - best youtube to mp3 converter app Videoodl.cc. · #videoslots.com. · #videoslots.com · #videoslots.com. · #videoslots.com · #videoslots.com.